मराठी विभागामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी डिजिटल फलक लावण्यात आलेले आहेत. सदरच्या डिजिटल फलकाच्या माध्यमातून भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत साहित्यिक वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विं. दा. करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांचा संक्षिप्त परिचय आणि साहित्यकृतींची ओळख करून देण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला समृद्ध साहित्य परंपरा लाभलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मधु मंगेश कर्णिक ,गो. नि .दांडेकर ,श्री . ना . पेंडसे ,माधव कोंडविलकर ,श्रीपाद काळे साने गुरुजी, कुसुम अभ्यंकर ,जयंत दळवी, संपतराव जाधव या साहित्यिकांचा संक्षिप्त परिचय आणि त्यांच्या साहित्यकृतीची ओळख मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी डिजीटल फलक तयार करण्यात आलेला आहे.
विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन पद्धतीसाठी प्रश्नपत्रिका संच बँक, ओपन बुक एक्झाम, प्रिलिमिनिरी एक्झाम, सरप्राईज टेस्ट, मौखिक परीक्षा या पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन केले जाते. त्याचबरोबर तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने अंतर्गत मूल्यमापन यामध्ये, सेमिनार, प्रोजेक्ट यांचे लेखन करवून घेण्यात येते.
उदिष्ट्ये (Objective) :
- मातृभाषा म्हणून मराठीचा विकास आणि संवर्धन करणे.
- मराठी ही एक समृद्ध भाषा आहे. तिचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढवून तिची प्रतिष्ठा वाढवता येईल.
- मराठी भाषेचा वापर इतर भाषांशी जोडणे.
उद्देश्य :
- विविध स्तरावर साहित्य आणि भाषा विकसित करणे.
- नवीन पिढी मध्ये साहित्यातून सामाजिक सांस्कृतिक जाणीव निर्माण करणे.
- मराठी भाषा आणि साहित्याच्या अभ्यासाला चालना देणे.
- विद्यार्थांच्या साहित्यिक कौशल्याना चालना देणे.
- देशासाठी संवेदनशील सुसंकृत अभ्यासू नागरिक घडवणे.
- बोलीभाषेचा अभ्यासातून आवड निर्माण करणे.
- मराठी ग्रंथ संपदा जतन करणे.